Karnataka Exit Poll 2023| भाजप ला धक्का? काँग्रेस ला उभारी मिळेल ? जेडीएस ठरवणार मुख्यमंत्री?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाची एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाली असून, भाजपला मोठा धक्का बसला आहे.
आकडेवारीनुसार, भाजपला धक्का देत काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसत आहे.
![]() |
Karnataka Exit Poll 2023| |
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा आज संपला असून, एकाच टप्प्यात सर्व २२४ जागांसाठी मतदान झाले आहे. आता १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदान पूर्ण झाल्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
TV9 भारतवर्ष-POLSTRAT एक्झिट पोलसह विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल आता समोर येत आहेत.
या एक्झिट पोलनुसार कर्नाटकात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, तरीही ते बहुमतासाठी कमी पडू शकतात, असे दिसते. आकडेवारी सांगते की कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे कर्नाटकात भविष्यातील सत्ताधारी पक्ष निश्चित करणे आव्हानात्मक आहे.
आमच्या युट्युब ला भेट द्या...
TV9 भारतवर्ष-POLSTRAT
एक्झिट पोलचे नेमके आकडे काय?
काँग्रेस – 99-109
जागा
भाजप – 88-98
जागा
जेडीएस- 21-26 जागा
इतर – 0-4
जागा
TV9 कन्नड-सी वोटरच्या एक्झिट पोलची आकडेवारी
काँग्रेस – 100-112
जागा
भाजप – 83-95
जागा
जेडीएस- 21-29 जागा
इतर – 02-06 जागा.
The Kerala Story Review| भयानक सत्य अंगावर काटा आणणारा चित्रपट| ३२ हजार मुली गायब होण्याचं वास्तव.
Post Comment
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
धन्यवाद! मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्या ब्लॉगवर आलात आणि आपले अभिप्राय व्यक्त कले.
अशाच नवनवीन माहिती साठी वेबसाईट ला भेट द्या, तुमच्या अभिप्रायाला लवकरच उत्तर मिळेल.