Dr. Panjabrao Deshmukh Scholarship| डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज कसा करावा - CNBC18 Marathi Your global Hub for News & Schemes

Top Ad

Breaking News

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship| डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज कसा करावा

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना: महाराष्ट्र सरकारने आधिकृत वेबसाइटवर महाडीबीटीच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये शिक्षण घेणार्‍या उमेदवारांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या जाहीर केल्या जातात. 

विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्त्यांची माहिती अधिकृत संकेतस्थळावरून मिळत असते. दहावीनंतर, बारावीनंतर, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षणासाठी आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठीही भारतीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकाकडून शिष्यवृत्ती दिली जाते.

डॉ . पंजाबराव देशमुख शिष्यवृती अर्ज ऑनलाईन कसा भरावा?

  1. 1.       डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. या शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी प्रथम mahadbtmahait.gov.in या वेबसाइटवर नवीन खाते तयार करणे आवश्यक आहे.
  2. 2.       जर तुमचे Mahadbt Login नसेल, तर तुम्ही नवीन युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
  3. 3.       चला, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्त्यासाठी स्टेप बाय स्टेप ऑनलाइन अर्ज कसा करावा ते जाणून घेऊ.

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship

तसेच, इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्र सरकार ३०,००० रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. 

डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आणि वस्तीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती महाराष्ट्र सरकारने चालू केलेले आहे.

पात्रता

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने ज्या शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांच्याकडून बोनाफाईड सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी सादर करणे आवश्यक असेल.
  • ज्या विद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे असे विद्यालय मान्यता प्राप्त असावे.
  • कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त मुले असू नये.
  • दहावी आणि त्याच्या पुढील मार्कशीट / प्रमाणपत्र अर्ज वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याचा अधिवास म्हणून तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • जर मजूर किंवा अल्पभूधारक म्हणून तुम्ही अर्ज करणार असाल तर त्याचे प्रमाणपत्र सोबत जोडणे गरजेचे असेल.
  • होस्टेलमध्ये राहत असलेल्याचे कागदपत्रसुद्धा तुम्हाला अर्ज सोबत जोडावे लागेल.

 

अर्ज प्रक्रिया


  • सदर अर्ज तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या पोर्टल वर जाऊन करू शकता.
  • पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  • होमपेजवर, "अर्ज करा" या पर्यायावर क्लिक करा.
  • "डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना" या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन नोंदणीसाठी, "नवीन नोंदणी करा" या पर्यायावर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा.
  • लॉगिन करण्यासाठी, "लॉगिन करा" या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या ईमेल आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करा.
  • "डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना" या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्ज भरून सबमिट करा.

अर्जाची कागदपत्रे


डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. 

या योजनेमुळे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात शिक्षण घेण्यास मदत होते.

प्रश्न: मी महाराष्ट्राबाहेरीलचा रहिवासी आहे. मी या योजनेसाठी अर्ज करू शकतो का?

उत्तर: नाहीही योजना फक्त महाराष्ट्राच्या रहिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे.


प्रश्न: मी इंजिनिअरिंग शिवाय दुसर्‍या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. मी अर्ज करू शकतो का?

उत्तर: नाहीही योजना फक्त इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.


प्रश्न: माझ्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त मुले आहेत. मी अर्ज करू शकतो का?

उत्तर: नाहीही योजना फक्त दोन किंवा त्यापेक्षा कमी मुलां असलेल्या कुटुंबांसाठी आहे.

प्रश्न: मी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे का?

उत्तर: होयअर्ज फक्त महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन स्वीकारले जातात.


प्रश्न: मी अर्ज भरण्यासाठी कोणती माहिती तयार ठेवावी?

उत्तर: तुमच्या शाळा/कॉलेजच्या बोनाफाईड सर्टिफिकेटमार्कशीटअधिवास प्रमाणपत्रव इतर आवश्यक कागदपत्रे तुम्ही तयार ठेवावीत.

How to Link PAN Card with Aadhar घरच्या-घरी आधार कार्ड पैसे न देता 'पॅन कार्ड सोबत असे करा लिंक, ३० जून २०२३ लास्ट डेट

प्रश्न: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दरवर्षी ३१ ऑगस्ट असते.


प्रश्न: या योजनेअंतर्गत किती रक्कम दिली जाते?

उत्तर: रक्कम भिन्न असते. मुंबईपुणेनाशिकआणि ठाणेसारख्या मोठ्या शहरांसाठी ३०,००० रुपये तर इतर भागांसाठी २०,००० रुपये दिले जातात.


प्रश्न: मला अर्जाची स्थिती कशी तपासायची आहे?

उत्तर: तुम्ही तुमच्या महाडीबीटी लॉगिनवर जाऊन "अर्जाची स्थिती" या पर्यायावर क्लिक करून तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का ते तपासू शकता.

प्रश्न: या योजनेसाठी फी कोणती आहे?

उत्तर: या योजनेसाठी कोणतीही फी आकारली जात नाही.

तुम्ही आमची वेबसाईट ला भेट दिलीये का? नसेल तर नक्की द्या..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

धन्यवाद! मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्या ब्लॉगवर आलात आणि आपले अभिप्राय व्यक्त कले.
अशाच नवनवीन माहिती साठी वेबसाईट ला भेट द्या, तुमच्या अभिप्रायाला लवकरच उत्तर मिळेल.