Manoj Jarange| आझाद मैदानावरच ठाण मांडणार! आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही - मनोज जरांगे ठाम
मुंबई पोलिसांनी जरी आंदोलनासाठी परवानगी नाकारली असली तरी, मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीला आझाद मैदानावरच मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.
यामुळे सरकार आणि आंदोलकांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
![]() |
Manoj Jarange| |
Government Scared with Manoj Jarange| सरकार घाबरलंय कारण जरांगे पाटील मॅनेज होणाऱ्यातला माणूस नाही.
Manoj Jarange| "आम्ही लोणावळ्यातून मुंबई गाठणार आहोत आणि आझाद मैदानावरच बसणार," असा स्पष्ट इशारा जरांगे यांनी दिला. "जनतेला त्रास
नको, पण सरकारने आमच्या 16% आरक्षणाच्या मागणीवर निर्णय
घ्यावा," अशी त्यांची मागणी आहे. ते म्हणाले, "मालकांनीच (मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री) यावर तोडगा
काढावा. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही."
Manoj Jarange| मुंबई पोलिसांनी मात्र शहरातील वाहतूक कोंडी आणि जनतेच्या त्रासाचा दाखला देत आंदोलनासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवले आहे. पण जरांगे यांनी या प्रस्तावाला नकार दिला असून, आझाद मैदानावरच आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मराठा आंदोलकांनीही आझाद मैदानावर व्यासपीठ तयार करण्याची आणि ध्वजस्तंभा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त याच मैदानावर झेंडावंदन करण्याचाही निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून
राज्यभर आंदोलन सुरू आहे. या मागणीवर अद्याप निर्णय न
झाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 26 जानेवारीला होणारे आंदोलन सगळ्यांच्याच लक्षात असणार आहे.
याशिवाय, या आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे सरकार आणि आंदोलकांनी चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Post Comment
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
धन्यवाद! मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्या ब्लॉगवर आलात आणि आपले अभिप्राय व्यक्त कले.
अशाच नवनवीन माहिती साठी वेबसाईट ला भेट द्या, तुमच्या अभिप्रायाला लवकरच उत्तर मिळेल.