Bigg Boss Marathi 5: जुन्या स्पर्धकांची परत येण्याची चर्चा कोण आहेत ते?
Bigg
Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५' हा शो प्रेक्षकांच्या मनात घर करतोय आणि तिसऱ्या आठवड्यातील
टास्क आणि सदस्यांच्या भांडणांनी प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे.
गेल्या आठवड्यात
अरबाज पटेल घराचा कॅप्टन झाला, आणि फोन कॉलमुळे सदस्य
भावुक झाले. पण आता प्रेक्षकांचं लक्ष 'भाऊचा धक्का' कडे लागलं आहे.
Bigg Boss Marathi 5: आजचा 'भाऊचा धक्का' खास आहे कारण आज रितेश देशमुखसोबत दोन पाहुणे येणार आहेत. हे पाहुणे काही साधे नाहीत तर बिग बॉस मराठीच्या आधीच्या पर्वातले स्पर्धक आहेत.
Thalapathy’ Vijay launches political party| आता विजयची तमिळनाडूच्या राजकारणात एन्ट्री
या पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात नेमका काय धमाल होणार, कोणाचा समाचार घेतला जाणार, आणि कोणाची बाजू घेतली जाणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
इंडेमॉल शाइन इंडियाने शेअर केलेल्या व्हिडिओत या दोघांची
झलक दिसतेय, ज्यामुळे प्रेक्षकांच्या
मनात कुतूहल निर्माण झालं आहे.
![]() |
Bigg Boss Marathi 5 |
Bigg Boss Marathi 5: कोण येणार आहे बिग बॉसमध्ये?
जर तुम्ही विचार करत असाल की या दोन पाहुण्यांमध्ये नेमके
कोण आहेत, तर ते आहेत जय दुधाणे आणि
उत्कर्ष शिंदे. हे दोघेही बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक होते. जयने
अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, तर उत्कर्ष शिंदे देखील
तिसऱ्या पर्वात होता. या दोघांच्या आगमनाने घरात नवी रंगत येईल याबद्दल कोणतीही
शंका नाही.
Bigg Boss Marathi 5: जय दुधाणेने या शोच्या सुरुवातीलाच निक्कीला वाईट स्पर्धक
म्हटलं होतं, तर उत्कर्षने सुरज चव्हाणला
नेहमीच पाठिंबा दिला आहे. सुरजने घरातील केर काढत असताना उत्कर्षने त्याच्यावर
कौतुकाची कमेंट केली होती, “शिक्षण नसूनही माज नाही, दुसऱ्यांचा अपमान नाही, खोटं नाटक नाही, आणि एकटा पुढे जाण्याची तयारी आहे” असं उत्कर्षने सुरजबद्दल
लिहिलं होतं.
आता हे दोन दमदार स्पर्धक 'भाऊच्या धक्क्या'वर येणार असल्याने, प्रेक्षकांच्या मनोरंजनाची सीमा पार होणार आहे. आजचा एपिसोड
खास ठरणार हे नक्की, आणि प्रेक्षकांना घरात
होणाऱ्या कल्लाची मोठी उत्सुकता आहे.
Bigg Boss Marathi 5: तुमचे काय मत आहे?
तुम्हाला वाटते जय आणि उत्कर्षची एंट्री शोमध्ये नवा वळण
घालणार का? कोणत्या स्पर्धकाचा फायदा होईल आणि कोणाला नुकसान होईल? तुमची मते कमेंट्समध्ये नक्की सांगा.
#BiggBossMarathi5 #JayDudhane #UtkarshShinde #BiggBossMarathi
Post Comment
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
धन्यवाद! मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्या ब्लॉगवर आलात आणि आपले अभिप्राय व्यक्त कले.
अशाच नवनवीन माहिती साठी वेबसाईट ला भेट द्या, तुमच्या अभिप्रायाला लवकरच उत्तर मिळेल.